इंग्लिश लीगमध्ये चेल्सी दुस-या क्रमांकावर

December 23, 2008 5:42 PM0 commentsViews: 4

23 डिसेंबर इंग्लिश प्रिमिअर लीगमधल्या एका महत्त्वाच्या मॅचमध्ये बलाढ्य चेल्सीला एव्हर्टन टीमने बरोबरीत रोखलंय. त्यामुळे गटात आघाडी मिळवण्याचे चेल्सीचे प्रयत्न फोल ठरले आहेत. 34व्या मिनिटाला चेल्सी टीमचा कॅप्टन जॉन टेरीला रेफरींनी रेड कार्ड दाखवलं. त्यामुळे टेरीला मैदानाबाहेर जावं लागलं. आणि या धक्क्यातून मग त्यांची टीम सावरलीच नाही. त्यामुळे आता अ गटात चेल्सीला दुस-या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. लिव्हरपूलची टीम 39 पॉइंट मिळवून गटात पहिल्या स्थानावर आहे. चेल्सीचे 38 पॉइंट्स झाले आहेत. तर 34 पॉइंट्स सह अ‍ॅस्टन व्हिला तिस-या स्थानावर आहे.

close