जम्मूमध्ये अतिरेक्यांचा कट उधळण्यात आला

December 23, 2008 5:57 PM0 commentsViews:

23 डिसेंबर जम्मूजम्मू आणि काश्मीरमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा होतोय. त्या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये अतिरेक्यांचा एक मोठा कट उधळण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना अटक करण्यात आली. एका ठिकाणी आत्मघातकी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. हे तिघेही पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्यांच्यापैकी एकाचं नाव गुलाम फरीद आहे. तो पाकिस्तानचा सैनिक आहे. 2001 मध्ये तो पाकिस्तानच्या इन्फंट्री बटालियनमध्ये भर्ती झाला होता. या सगळ्या अतिरेक्यांना मौलाना मसूद अजहरचा लहान भाऊ मौलानं रौफनं प्रशिक्षण दिल्याचं समजतंय. ढाक्यामधून त्यांनी भारतात प्रवेश केला. त्यांच्याकडं बनावट शिपिंग आयकार्ड आहेत. या तिघांसोबतच आणखी 4 अतिरेकी आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. जम्मू रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी रविवारी 4 संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यात हरकत-उल-जिहादी-इस्लामीच्या कमांडरचा समावेश आहे.

close