कसाबला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

December 24, 2008 4:44 AM0 commentsViews: 1

24 डिसेंबर, मुंबईमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेला गेलेला तो एकमेव अतिरेकी आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याच्याकडून बरीच महत्त्वाची माहिती मिळत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कोर्टात हजर न करता, क्राईम ब्रँचमध्येच न्यायाधिशांना बोलवण्यात आलं.मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे सर्व दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती अजमल कसाब याने दिली आहे. पोलीस चौकशीत 26/11 मधील पाकिस्तानच्या सहभागाविषयी बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पुढील चौकशीत त्याच्याकडून आणखीन बरीच माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.कसाबचं वकीलपत्र घेण्यास वकीलांच्या संघटनेनं नकार दिला होता. कसाबचं वकीलपत्र स्वीकारण्याची तयारी दाखवणार्‍या अ‍ॅड. अशोक सरोगी आणि महेश देशमुख यांच्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन छेडलं होतं. मंगळवारी सामना ला दिलेल्या मुलाखतीत कसाबला लवकरात लवकर फासावर चढवण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर कसाबच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close