मनसेकडे राजकीयदृष्ट्या पहातही नाही – शिवसेनाप्रमुख

December 24, 2008 4:56 AM0 commentsViews: 2

24 डिसेंबर, मुंबईराज ठाकरेंच्या मनसेकडं राजकीयदृष्ट्या पाहतच नाही असंही बाळासाहेबांचं म्हणणं आहे. 'सामना' या दैनिकात बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचा शेवटचा भाग बुधवारी प्रकाशित झाला. या मुलाखतीत बाळासाहेबांनी शिवसैनिकांना महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं नातं नवरा बायकोच्या नात्यासारखं असल्याचं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलंय. येत्या 23 जानेवारीला त्यांचा वाढदिवस त्यांनी साजरा न करायचं ठरवलं आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानं ते व्यथित झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या वर्षी वाढदिवसानिमित्तानं शिवसैनिकांनी मला भेटायला आणि शुभेच्छा द्यायलाही येऊ नये असं आवाहन त्यांनी आपल्या मुलाखतीत केलं आहे.

close