गजनी गुरुवारी रिलीज होणार

December 24, 2008 5:53 AM0 commentsViews: 33

24 डिसेंबर, मुंबईमुंबई हायकोर्टाने गजनीचं रिलीज थांबवण्यास देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गजनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार रिलीज होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. गजनीच्या हिंदी सिनेमाचे हक्क आपल्याकडेच आहेत असा नवा दावा केबीसी पिक्चर्सने केला होता. त्यामुळेच हा पेच आणखी वाढला होता.पण आता कोर्टाच्या कचाटयात सापडल्यानंतरही रिलीजसाठी गजनीचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टात केबीसी पिक्चर्सने हिंदी गजनीचे हक्क आपल्याकडेच असल्याचा दावा केला असला तरी कोर्टाने गजनी रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. यासाठी गजनीच्या निर्मात्यांना कोर्टात पाच कोटी रुपये भरावे लागणार आहेत. अखेर गजनी रिलीज होत असल्याबद्दल आमीर खानने समाधान व्यक्त केलं.

close