आयसीसी टेस्ट क्रमवारीत भारत दुसर्‍या स्थानावर

December 24, 2008 6:35 AM0 commentsViews: 3

24 डिसेंबरमोहाली टेस्ट ड्रॉ झाली आणि इंग्लंडविरुध्दची दोन टेस्ट मॅचची सीरिज भारतानं एक-शून्य अशी जिंकली. या विजयाबरोबरच भारतानं आयसीसी क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली.टीम इंडियाला जिंकायची जणू त्यांना चटकच लागलीय. वनडे पाठोपाठ भारतीय टीमचा टेस्टमध्येही विजयी धडाका कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द नुकतीच झालेली टेस्ट सीरिज भारतानं दोन शून्य अशी जिंकली आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर कब्जा केला. तर आता इंग्लंडविरुध्दची टेस्ट सीरिजही भारतानं एक-शून्य अशी जिंकत या वर्षात मोठी मजल मारली. तायमुळेच आयसीसी टेस्ट क्रमवारीत भारतानं थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. 2008 चा हा सिझन भारतीय टीमसाठी विशेष उल्लेखनीय ठरला आहे. या वर्षात भारतीय टीमनं तब्बल पाच टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवले आणि तेही बलाढ्य टीमविरुध्द. या विजयी कामगिरीमुळे आयसीसी टेस्ट क्रमवारीत भारत 118 पॉईंटसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या दक्षिण आफ्रिकेला भारतानं मागे टाकलंय. दक्षिण आफ्रिका आता 117 पॉईंट्सह तिसर्‍या क्रमांकावर गेले आहेत तर पहिल्या नंबरवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 130 पॉईंटसची नोंद आहे. पण बलाढ्य टीमना पराभवाचा धक्का देणार्‍या भारतीय टीमच लक्ष आहे ते आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान गाठायचं आणि या दिशेनं त्यांची वाटचालही सुरू आहे.

close