आर. आर. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

December 24, 2008 4:12 AM0 commentsViews: 4

24 डिसेंबर, मुंबईराष्ट्रवादीनं आता निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची मंगळवारी नागपूरमध्ये बैठक झाली. याच बैठकीत आर. आर. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून की काय पाच एकरावरील शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन टाका असा आदेश पवारांनी दिला. प्रचारासाठी कार्यकर्त्यांना पवारांनी मुद्दाही देऊन टाकला. इतर देशांना अन्नधान्य निर्यात करण्याची ताकद देशात आलीय असं पवार म्हणाले.-यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित. आर. आर. पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन आणि त्याच वेळी कार्यकर्त्यांना प्रचाराचेही मुद्दे देऊन शरद पवार यांनी निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं मानण्यात येत आहे.

close