कांदिवलीमध्ये सिलेंडरचा स्फोट, एक ठार

December 24, 2008 4:30 AM0 commentsViews: 3

24 डिसेंबर, मुंबईमुंबईतल्या कांदिवली भागातल्या दामू नगर भागात मंगळवारी रात्री सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अवैध्यरीत्या गॅसची विक्री होत असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. धर्मेश पांडे या व्यक्तीचे हे गोडाऊन असून तो याठिकाणी भरलेल्या सिलेंडर मधील काही गॅस काढून तो इतर सिलेंडरमध्ये भरून विकत असल्याचंही स्थानिक नागरिकांनी सांगितलं. या ठिकाणावरून पोलिसांनी 63 सिलेंडर जप्त केले आहेत.

close