जम्मू कश्मीरमध्ये शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू

December 24, 2008 8:23 AM0 commentsViews: 5

24 डिसेंबर, जम्मू काश्मीरजम्मू आणि काश्मीरमध्ये बुधवारी शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात जम्मू आणि श्रीनगरमधल्या 21 मतदारसंघात मतदान होत आहे. माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमध्ये मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसच विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढा आहे. जम्मू आणि सांबा यामधल्या भागात अमरनाथ जमिनीच्या मुद्द्याला मोठा पाठिंबा मिळाला होता. श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला निवडणूक लढवत् आहेत. श्रीनगरमध्ये मतदानाची आकडेवारी कमी होण्याची शक्यता आहे. मतमोजणी 28 तारखेला होणार आहे.

close