कसाब प्रकरणी नवाज शरीफ यांचा यु टर्न

December 24, 2008 8:40 AM0 commentsViews: 7

24 डिसेंबरपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावर पलटी मारली आहे. मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध नसल्याबद्दल आपल्याला खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतानं पहिल्यांदा कसाब पाकिस्तानी असल्याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केलीय. जर ते पुरावे सिद्ध झाले तर आपण स्वतः झरदारी यांच्याशी बोलून अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करायला सांगू, असं शरीफ म्हणाले. शरीफ यांनी सुरवातीला कसाब पाकिस्तानी असल्याचं कबूल केलं होतं. आणि पाकिस्तान सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

close