अशीही ‘शाळा’ दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वसुली

March 18, 2013 4:18 PM0 commentsViews: 39

अलका धुपकर, मुंबई

18 मार्च

मुंबई : खाजगी शाळांनी केलेल्या फीवाढीचे प्रश्न सुटत नाही. कारण, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मंजूर केलेला कायदा अजून अंमलात आलेला नाही. माहिम इथंली कनोसा ही मुलींची अनुदानित शाळा आहे. पण शाळेने दोन हजार विद्यार्थ्यांकडून मेंटेनन्स चार्जेस आकारायला सुरवात केली आहे. अनुदानित शाळेला असे कोणतेही पैसे पालक-विद्यार्थ्यांकडून आकारता येत नाहीत. त्यामुळे पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर आता शिक्षण विभाग शाळेची चौकशी करतंय.

कनोसा कॉन्व्हेन्ट ही माहिम मधली मुलींची प्रसिद्ध शाळा. वर्षाला अडीच हजार रुपये मेटेन्सस फी म्हणून वसूल करण्यात आले. त्यानंतर पाचशे रुपये. आणि पुन्हा अडीच हजार. फक्त पाचशे, किंवा हजार रुपये म्हणजे फार मोठी रक्कम नाही. असं भासवलं जातं. पण, या पालकांनी प्रत्येक रूपयाचा हिशेब घातला तेव्हा पैसे जातात कुठे, याचा शोध त्यांना लागलाय. शाळेने मात्र, हे सगळे आरोप फेटाळले आहे.

close