नामदेव ढसाळांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान

March 18, 2013 5:32 PM0 commentsViews: 129

18 मार्च

पुणे महापालिकेतर्फे दिल्या जाणार्‍या पहिल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं. ज्येष्ठ कवी, दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांना हा पुरस्कार देण्यात आला. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी पुरस्कारांच्या निमित्तानं मिळालेली 1 लाख 11 हजार रुपयांपैकी 50 हजार रक्कम ढसाळ यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दिली. पँथर चळवळीच्या आठवणी जागवताना ही चळवळ कशी भरकटत चालली आहे असं नामदेव ढसाळ यांनी सांगितलं. तर पँथर चळवळीच्या आठवणी आणि रिपब्लिकन पक्षाचा प्रवास रामदास आठवलेंनी जागवला. यावेळी पुणे महापालिकेच्या महापौर वैशाली बनकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आवाड असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

close