‘सर, बहिष्कार मागे घ्या’, विद्यार्थ्यांची ‘रिक्वेस्ट’

March 18, 2013 9:43 AM0 commentsViews: 59

18 मार्च

सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामावर टाकलेल्या बहिष्कारावर 42 दिवसानंतरही तोडगा निघालेला नाही. राज्यातील अनेक कॉलेजेसच्या परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. परीक्षेचं वेळापत्रक लागतंय, पण ऐन परीक्षेच्या दिवशी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहे. अमरावती, कोल्हापूर विद्यापीठात परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकार आणि शिक्षकांनी बहिष्काराच्या या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी आता विद्यार्थी स्वत:च करू लागले आहे.

अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक संपावर गेल्याने परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा विषयक कामावरच प्राध्यापकांनी बहिष्कार घातल्याने प्रश्नपत्रिका वेळेवर तयार झाल्या नाहीत त्यामुळे अमरावती विद्यापीठाने परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला आहे. आर्टस आणि कॉमर्सच्या प्रथम वर्ष ते तृतीय वर्षांपर्यंतच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे एसएनडीटी ,पुणे, कोल्हापूर, अमरावती, जऴगाव आणि नागपूर यासंह एकूण आठ विद्यापीठातले विद्यार्थी सध्या हवालदिल झाले आहेत. प्राध्यापक आपल्या मागणीवर ठाम असून सरकारनं फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. मागील आठवड्यात ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेतला. विशेष म्हणजे राज्य सरकारने प्राध्यापकांची मुख्य अट 2500 बिगर सेट नेट आणि पीएचडी धारकांना नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसंच प्राध्यापकांचे थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची तरतूद केली आहे. प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन उच्च तंत्रज्ञान आणि शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. मात्र प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घेण्यास स्पष्ट नकार दिलाय.

close