शिवाजी विद्यापीठाने दिल्या विद्यार्थ्याना सायकली

December 24, 2008 9:47 AM0 commentsViews: 99

24 डिसेंबर कोल्हापूरशिवाजी विद्यापीठाने वसतीगृहातील मुलींना सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. कारण त्यामुळे विद्यापीठात परिसरातील प्रदूषणाला आळा बसेल, अशी विद्यापीठ प्रशासनाची खात्री आहे. शिवाजी विद्यापीठाचा परिसर सुमारे 800 एकरात पसरलेला आहे. या संपूर्ण परिसरात असणा-या 39 शैक्षणिक विभागात फिरण्यासाठी विद्यार्थी दुचाकी वाहन वापरतात. पण यामुळे प्रदूषणात भर पडते. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं सायकलच्या वापराची योजना सुरू केली आहे. त्यासाठी प्रशासनानं विद्यार्थ्याना विद्यापीठाच्या आवारातील ये-जा करण्यासाठी सायकली उपलब्ध करून दिल्या आहेतप्रवासासाठी सायकल चालू करणे हा एकच उद्देश या योजनेचा नाही. पहिला उद्देश पर्यावरणाचा आहेच. तर दुसरा उद्देश विद्यापीठाच्या आवारातील सगळया शैक्षणिक उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असा आहे असं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु माणिकराव साळुंखे यांनी स्पष्ट केलं. आता लवकरच दुस-या टप्प्यात मुलांना सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे यानंतर विद्यापीठात मोटारसायकली कमी आणि सायकली जास्त असं चित्र पहायला मिळणार आहे. सायकल योजना राबविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला 15 लाख खर्च आला आहे. पर्यावरणाचं रक्षण करा, प्रदूषण टाळा असा संदेश सगळेच देतात. पण सद्यातरी हा संदेश प्रत्यक्षात उतरवलाय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं.

close