राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी झेंडा

March 18, 2013 10:34 AM0 commentsViews: 39

18 मार्च

नवी दिल्ली : 60 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची दिल्लीत घोषणा झाली. यंदाच्या पुरस्कारात मराठी झेंडा पुन्हा एकदा डोलाने फडकला. जेष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी दिग्दर्शित 'इन्व्हेस्टमेंट' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यापाठोपाठ इरफान खान याला पानसिंग तोमरसाठी आणि जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना 'अनुमती'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार(विभागून) घोषित करण्यात आला आहे. तर पार्श्वगायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना बेस्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हिंदी विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाची शर्यंत जिंकली ती 'पानसिंग तोमार'ने. याच सिनेमासाठी इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तसंच 'स्पॅम डोनर'वर आधारीत 'विकी डोनर' सिनेमाने लोकप्रिय सिनेमाचा बहुमान पटकावला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान 'पानसिंग तोमर' आणि विक्रम गोखले (अनुमती) विभागूनबेस्ट मराठी सिनेमा – इन्व्हेस्टमेंट बेस्ट एडिटिंग नम्रता राव (कहानी )बेस्ट पार्श्वगायिका आरती अंकलीकर-टिकेकर (समिधा)सर्वोत्कृष्ट लोकप्रिय हिंदी चित्रपट – विकी डोनरज्युरींचा विशेष पुरस्कार परिणीती चोप्रा परिणीती चोप्रासर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट विकी डोनरसर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फिक्शन) – कातळ'संहिता'च्या संगीतासाठी शैलेंद्र बर्वेला रजतकमळ बेस्ट आर्ट/कल्चरल फिल्म – मोदीखान्याच्या दोन गोष्टी (रजतकमळ) सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फिक्शन) – कातळविशेष ज्युरी पुरस्कार – हंसराज पाटील ( बालकलाकार,धग)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शिवाजी लोटन पाटील ( धग)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – उषा जाधव (धग)

'संहिता'च्या संगीतासाठी शैलेंद्र बर्वेला रजतकमळ बेस्ट आर्ट/कल्चरल फिल्म मोदीखान्याच्या दोन गोष्टी (रजतकमळ) पदार्पणातील बेस्ट फिल्म दिग्दर्शक चित्तगाँग (हिंदी)पदार्पणातील बेस्ट फिल्म दिग्दर्शक (मल्याळम) 101 छोडियांगल

close