भारताची विजयी हॅटट्रिक, टेस्ट मालिका जिंकली

March 18, 2013 11:20 AM0 commentsViews: 7

18 मार्च

मोहाली : येथे खेळवण्यात आलेल्या तिसर्‍या टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटनं दारूण पराभव केलाय. ही मॅच जिंकत टीम इंडियाने मालिका खिश्यात घातली आहे. 4 मॅचच्या सीरिजमध्ये 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. मॅचच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पहिल्याच सेशनमध्ये भारतीय बॉलर्सनं ऑस्ट्रेलियाला दणका दिला आणि ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन झटपट पॅव्हेलियनमध्ये परतवले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅट्समननं किल्ला लढवला. मिचेल स्टार्क आणि झेविअर डोहेर्तीनं संयमी बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाला 133 रन्सची आघाडी मिळवून दिली… भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 तर ओझा आणि अश्विननं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर 133 रन्सचं टार्गेट घेऊन खेळणार्‍या भारतीय बॅट्समननं इनिंगची सुरुवात सावध केली. पण डोहेर्तीनं विजयला तर लायननं पुजाराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर विराट कोहलीलाही पीटर सिडलनं आऊट केलं. पण सचिन आणि धोणीनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आता चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकत भारत ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देतोय का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close