वडाळ्यात एकाच कुटुंबातल्या चार जणांचे मृतदेह सापडले

March 18, 2013 11:39 AM0 commentsViews: 4

18 मार्च

मुंबई : वडाळा येथील भक्तीपार्कात असलेल्या ओडीसी या इमारतीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरच्या खोली क्रमांक 501 मध्ये राहणार्‍या जेनेटस ऍन्थोनी, त्यांची पत्नी एलिझाबेथ ऍन्थोनी, मुलगा जेसन आणि मुलगी बिलीयाना यांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार ही सामूहिक आत्महत्या असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात पोलीस सर्वच शक्यता तपासून बघत आहेत.

close