मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात रास्ता रोको

March 18, 2013 8:11 AM0 commentsViews: 18

18 मार्च

कोल्हापूर : येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तावडे हॉटेल परिसरात मराठा आरक्षण संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आरक्षण संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार आरक्षणाबाबत दुर्लक्ष करत असून जर आरक्षण मिळालं नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनावेळी एका बसवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

close