शरीरसंबंधाचं वय 16 नव्हे 18 चं!

March 18, 2013 5:20 PM0 commentsViews: 19

18 मार्च

नवी दिल्ली : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या बलात्कारविरोधी नव्या विधेयकात आणखी बदल करण्यात आलाय. परस्पर सहमतीनं शरीरसंबंध ठेवण्याचं वय 16 वरून वाढवून पुन्हा 18 करण्यात आलंय. या नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता हे सुधारित विधेयक उद्या लोकसभेत सादर करण्यात येईल. यापूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे वय 18 वरून 16 करण्यात आलं होतं. या विधेयकावर आज दोन वेळा सर्वपक्षीय बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात विधेयकातल्या काही तरतुदींवर अनेक पक्षांनी आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात या तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यात आलीय. पाठलाग करणं आणि दुसर्‍यांचे शरीरसंबंध चोरून बघणं, याविरोधातल्या तरतुदीही काहीशा सौम्य करण्यात येणार असल्याचं समजतंय.

close