नागपूर विधानसभा परिसरात साप सापडला

December 24, 2008 12:00 PM0 commentsViews: 91

24 डिसेंबर नागपूरनागपूर इथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभा इमारतीच्या बाजूला धामण आढळून आली. इमारतीच्या बाजूला साप असल्याचं कळल्यानंतर तिथं लोकांची एकच गर्दी झाली. आजूबाजूला झाडी असल्याने येथे धामण जातीचा 7 फूटाचा साप आला असावा. त्यानंतर लगेचच एका सर्पमित्राला त्याला पकडण्यासाठी बोलावण्यात आलं. ही सारी गडबड 3 तासापर्यंत सुरू होती. ह्या सापाला पकडल्यानंतर सर्वांनीच सुटेकचा निश्वास टाकला.

close