खेडजवळ बस नदीत कोसळून 37 ठार

March 19, 2013 9:40 AM0 commentsViews: 30

19 मार्च

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. गोव्याकडून मंुबईकडे येणारी लग्झरी बस खेडजवळ जगबुडी नदीत पडली. यात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला. महाकाली ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस जगबुडी नदीच्या पुलावरुन जात असताना चालकाचा अचानक ताबा सुटल्यानं पुलाचा कठडा तोडून बस नदी पात्रात कोसळली. दुष्काळामुळे नदीपात्र कोरडे असल्यामुळे बस खडकावर कोसळल्यानं मोठी जिवीतहानी झाली. या बसमध्ये काही विदेशी पर्यटकही असल्याची माहिती मिळतेय. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आणि तातडीनं मदत कार्य सुरु झालं. जखमींना मुंबई, कोल्हापूर आणि डेरवण इथं हलवण्यात आलंय.

close