प्राध्यापकांच्या बहिष्कारावर दोन दिवसात तोडगा काढू -टोपे

March 19, 2013 7:47 AM0 commentsViews: 49

19 मार्च

मुंबई : सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामावर टाकलेल्या बहिष्कारावर 43 दिवसानंतरही तोडगा निघालेला नसून अनेक कॉलेजेच्या परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. अखेरीस याबाबत आज एफफुक्टोच्या सदस्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. येत्या दोन दिवसात या प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासनही दिलं आहे. मात्र प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे. परीक्षेचं वेळापत्रक लागतंय, पण ऐन परीक्षेच्या दिवशी परीक्षा पुढे ढकलल्याचं कळतंय अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची झाली. सरकार आणि शिक्षकांनी बहिष्काराच्या या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी आता विद्यार्थी स्वत:च करू लागले आहे.

close