पोलीस अधिकार्‍याला मारहाण चुकीची -राज ठाकरे

March 19, 2013 12:13 PM0 commentsViews: 19

19 मार्च

मुंबई : विधानभवनात पोलीस अधिकार्‍याला आमदारांनी केलेली मारहाण अत्यंत चुकीची आहे. शासकीय असो अथवा पोलीस अधिकार्‍याला मारहाणही कदापी मान्य केली जाणार नाही. पोलिसांवर जर कोणी हात उचला असेल आणि तो माझ्या पक्षाचा कोणीही कार्यकर्ता,आमदार असला तरी लोकशाही पद्धतीने त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध व्यक्त करत राम कदम यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहे. तसंच जरी तो पोलीस अधिकारी चुकीचा वागला असेल त्यावर नियमाने आमदारांना कारवाई करता आली असती पण त्यांनी तसं का केलं नाही ? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. मनसेचे गटनेत बाळा नांदगावकर यांनी विधानसभेत पक्षाध्यक्षांचे पत्रक वाचून मनसेची भूमिका स्पष्ट केली. आझाद मैदानावर झालेल्या हिंसाचारात पोलिसांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राज ठाकरेंनी भव्य मोर्चा काढून पोलिसांची पाठराखण केली होती. त्यानंतरही अनेक सभेमधून राज यांनी पोलिसांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले होते. यावेळी त्यांच्या पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलीस अधिकार्‍याला मारहाण केल्यामुळे राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close