IPL साठी लंकेच्या खेळाडूना चेन्नईत बंदी ?

March 19, 2013 12:27 PM0 commentsViews: 22

19 मार्च

तामीळनाडू : येथे द्रमुक विरूद्ध श्रीलंका वादाचा आयपीएलला फटका बसण्याची शक्यता आहे. चेन्नईत होणार्‍या सामन्यांत श्रीलंकेचे खेळाडू खेळणार की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. चेन्नईत होणार्‍या श्रीलंकाविरोधी निदर्शनांमुळे बीसीसीआय सध्या चिंतेत आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईतल्या मॅचेसपासून दूर राहण्यास सांगितलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आयपीएलमधील 9 पैकी 8 टीम्समध्ये श्रीलंकेचे खेळाडू आहेत. तर चेन्नईमध्ये आयपीएलच्या 10 मॅचे होणार आहेत. इतकचं नाही तर या वादाचा फटका इतर क्रीडा स्पर्धांनाही बसलाय्. फेब्रुवारी महिन्यात चेन्नईत होणारी एशिअन ऍथलेटिक स्पर्धाही तामिळनाडू सरकारनं रद्द केली होती.

close