विधीमंडळातल्या महिला आमदार नाराज

December 24, 2008 1:00 PM0 commentsViews: 12

24 डिसेंबर नागपूरकल्पना नळसकर नागपूर विधीमंडळात बोलायला मिळत नाही अशी महिला आमदारांची तक्रार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 12 महिला आमदार आहेत तर विधानपरिषदेत 6 महिला आमदार आहेत. आपले प्रश्न मांडायला संधी मिळत नसल्यानं महिला आमदार नाराज आहेत. प्रत्येक पक्षाला विधीमंडळात चर्चेसाठी ठराविक वेळ दिला जातो. त्यातही पक्षामधल्या महिला आमदारांच्या वाट्याला कमी वेळ येतो. या प्रश्नांवर तोडगा काढण्यसाठी महिला आमदारांनी थेट सभापतींकडे आपलं गा-हाणं मांडलं. आपले प्रश्न मांडण्यासाठी वेळ मिळत नाही अशी तक्रार करण्यासाठी पक्षभेद विसरून महिला आमदार आता एक होत आहेत. या सर्वपक्षीय महिला आमदारांना शोभेचं आमदार पद मिरवण्यात रस नाही. 33% आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी मिळाली. आणि आता धोरण ठरवण्यामध्येही आपला सहभाग व्हावा अशी या महिला आमदारांची इच्छा आहे.एकूणच देशात मौनी आमदार आणि खासदारांची संख्या कमी नाही. पण महाराष्ट्रातील महिला आमदारांना मात्र मौनी बनणं मान्य नाही. विधीमंडळातील पुरुषी वर्चस्वालाही त्यांना धक्का द्यायचाय.

close