बलात्कारविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

March 19, 2013 5:16 PM0 commentsViews: 4

19 मार्च

नवी दिल्ली : बलात्कारविरोधी विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं. यात बलात्कार करणार्‍या गुन्हेगारांना जन्मठेप तसेच फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पण ऍसिड हल्ला किंवा लहान मुलांच्या तस्करीसाठी जन्मठेपेची शिक्षा असणार नाही. पाठलाग आणि दुसर्‍याचे शरीरसंबंध चोरून पाहणं हे गुन्हे एखाद्याकडून पहिल्यांदाच होत असेल तर ते अजामीनपात्र असणार नाहीत. पण, हे गुन्हे दुसर्‍यांदा मात्र अजामीनपात्र असतील. सहमतीनं ठेवल्या जाणार्‍या शरीरसंबंधाचं वय 18 करण्यात आलंय. उद्या हे विधेयक राज्यसभेत ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर मतदान होईल.

close