अन्नसुरक्षा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

March 19, 2013 5:28 PM0 commentsViews: 20

19 मार्च

नवी दिल्ली : यूपीए सरकारचं महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मात्र या विधेयकातल्या काही तरतुदींना आक्षेप होता. हा कायदा लागू झाला तर 20 लक्ष टन धान्याची टंचाई निर्माण होईल अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. तर सरकारवर अनुदानापोटी 25 हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल असं चिदंबरम यांचं म्हणणं आहे. हे विधेयक आता येत्या शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. हा कायदा मंजूर झाला तर देशातल्या 67 टक्के लोकांना म्हणजे तब्बल 80 कोटी लोकांना तांदुळ 3 रुपये किलो. गहू 2 रुपये किलो आणि डाळी 1 रूपया किलोने मिळेल.

close