‘फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांवर कारवाई अयोग्य’

March 20, 2013 5:53 PM0 commentsViews: 35

20 मार्च

वाशिम : आमदारांवर निलंबनाची जी कारवाई केलीय ती व्देषापोटी केलेली आहे. फक्त विरोधी पक्षाचे आमदारांवरच ही कारवाई केली हे चुकीचे आहे. ज्यावेळी ती घटना घडली त्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित होते. सत्ताधारी आमदारांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी अर्थसंकल्प सादर करू देणार नाही अशी धमकी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही. हे चुकीचे आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. सत्ताधारी आमदारांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच पोलिसांवर हात उगारणे अत्यंत चुकीचे आहे. मी अनेक सभा आणि आझाद मैदानावरील घटनेबद्दल सुद्धा हेच बोललो होतो. आज तुम्ही पोलिसांवर हात टाकला, उद्या संपादकांवर टाकालं, न्यायधीशांवर हात टाकालं. अनेक अशा घटना घडतात आम्हालाही राग येतो पण पोलिसांवर हात टाकायचा नसतो. वाहतूक पोलिसांने अडवले म्हणून हा काय हक्कभंगाचा विषय आहे का ? राज्यात एवढे प्रश्न असताना पोलिसांने आमदाराला पकडले हे काय विषय आहे का ? असा परखड सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

close