आमदारांवर होणार निलंबनाची कारवाई ?

March 20, 2013 7:39 AM0 commentsViews: 4

20 मार्च

विधिमंडळामध्ये मंगळवारी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आज राज्याचे बजेट मांडण्यापुर्वी दोन प्रस्ताव सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिला प्रस्ताव असेल तो सचिन सुर्यवंशी यांच्या निलंबनाचा आणि दुसरा प्रस्ताव असेल तो मारहाण प्रकरणातील आमदारांचा. नक्की किती आमदारांचं निलंबन केलं जाईल हे काही अजुन कळू शकलेलं नाही. दरम्यान, आज सकाळी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सूर्यवंशी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांच्यासह 15 आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आज जर निलंबनाची कारवाई झाली तर आमदारांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

close