अखेर द्रमुकच्या 3 मंत्र्यांचे राजीनामे

March 20, 2013 7:56 AM0 commentsViews: 8

20 मार्च

नवी दिल्ली : द्रमुकच्या तीन मंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा दिला. एस. एस. पलनिमक्कम, एस. गांधीसेल्वम आणि एस जगतरक्षकन या तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला असून उरलेले दोन मंत्रीही राजीनामा देतील अशी माहिती द्रमुकचे नेते टी आर बालू यांनी दिली. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेने श्रीलंकेविरोधातला ठराव सौम्य करण्यामागे भारत सरकारचा हात आहे असा आरोप द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी केला आहे. मंगळवारी द्रमुकने यूपीए सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता आणि सरकारला शुक्रवारपर्यंतचा वेळ दिला होता. अखेरीस आज द्रमुकने आणखी दबाव टाकत तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे.

close