‘यूपीएला कोणताही धोका नाही, सरकार स्थिर’

March 20, 2013 8:04 AM0 commentsViews: 2

20 मार्च

नवी दिल्ली : द्रमुकने पाठिंबा जरी काढून घेतला तरी केंद्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. द्रमुकने मंगळवारी पाठिंबा काढल्यानंतर आज अर्थमंत्री पी.चिदंबरम, संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ आणि माहिती आणि सुचना मंत्री मनिष तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थीर असल्याचं सांगितलं. तसंच श्रीलंकेत तामिळांवर होणार्‍या अत्याचाराबाबत करुणानिधी यांच्याशी चेन्नईला जावून चर्चा केल्याचही अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलं. पण त्यांनी अचानक पाठिंबा काढण्यावरही चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

close