दलित कुटुंबाला मारहाण करून घर पेटवले

March 20, 2013 8:13 AM0 commentsViews: 57

20 मार्च

सोलापूर : येथे माळशिरसमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला. पानीव गावात जमावानं एका दलित कुटुंबाला मारहाण करून त्यांचे घर पेटवून दिले. या प्रकरणी आरोपी अभिषेक प्रकाश पाटील, तानाजी संदीपान भोसलेसह अन्य 25 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं समजतं. या हल्ल्यात जगन्नाथ नातू तोरणे यांच्या घरावर जमावानं हल्ला केला. या हल्ल्यात जगन्नाथ यांच्या आई देवई गंभीर जखमी झाल्यात. तसंच त्यांची बहिण उज्ज्वला शिंदे यांनाही शिवीगाळ करण्यात आली. हा जमाव एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी घरावर तुफान दगडफेक करून घर पेटवून दिले. या प्रकरणी जगन्नाथ तोरणे यांनी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केला. तर त्यांच्यावरच आरोपींनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

close