राडेबाज पाच आमदार निलंबित

March 20, 2013 9:58 AM0 commentsViews: 36

20 मार्च

एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण प्रकरणी अखेरीस 5 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल, भाजपचे आमदार जयकुमार रावल, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. या पाचही आमदारांना 9 महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. आता या निलंबित आमदारांना मुंबई आणि नागपूर विधिमंडळ आवारात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनालाही हे आमदार मुकणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राडेबाज आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मंाडला. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी या पाच आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली.

मंगळवारी विधानभवनाच्या प्रांगणात एपीआय सचिन सूर्यवंशींना 5 आमदारांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केलाय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही कारवाई होणारच असं स्पष्ट केलं होतं. अखेरीस एपीआयला मारहाण प्रकरणा आमदारांना भोवले असून निलंबित करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार क्षितीज ठाकूर,राम कदम यांच्यासह 15 आमदारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता निलंबनाच्या कारवाईनंतर आमदारांना अटक होण्याची शक्यता आहे.

close