महाबजेट :सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी खंबीर !

March 20, 2013 4:28 PM0 commentsViews: 19

20 मार्च

मुंबई : राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती होरपाळणार्‍या दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये दुष्काळग्रस्तांसाठी 1140 कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर चारा टंचाई दूर करण्यासाठी 47 कोटी 95 लाख रूपये आणि फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी 791 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच पाणी टंचाई दूर करण्यासाठी 850 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या बजेटच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासाठी 25 टक्के निधी हा पाण्यासाठी असेल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसारच संपूर्ण बजेटमध्ये बळीराजाला सरकारने दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ तंबाखूजन्य पदार्थ आणि सोनं,हिरे, सौंदर्य प्रसाधनावर कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोनं,हिरे, विडी,सिगारेट, देशी,विदेशी मद्य, लॉटरी महागणार आहे. वेगवेगळ्या करांमध्ये वाढ केल्याने पुढील आर्थिक वर्षात महसुलात 1150 कोटीची वाढ होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

दुष्काळ निवारण्यासाठी महाबजेटमध्ये तरतुदी- दुष्काळग्रस्तांसाठी 1140 कोटींचा निधी- चारा टंचाई दूर करण्यासाठी 47 कोटी 95 लाख रूपये – फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी 791 कोटी – पाणी टंचाईसाठी 850 कोटी

close