बॉलिवुड रिलीज

December 24, 2008 3:22 PM0 commentsViews: 10

24 डिसेंबर, मुंबईसध्या सगळ्यांचा मूड आहे सुट्टीचा. ख्रिसमसमुळे हिंदी सिनेमे एक दिवस आधीच रिलीज होत आहेत. यावेळी सगळ्यांना उत्सुकता आहे ती गजनीची. आणि गजनीबरोबर ' जम्बो ' हा अ‍ॅनिमेटेड सिनेमाही रिलीज होत आहे. बरेच दिवस गजनीची प्रि पब्लिसिटी चालू आहे. आमिर खाननं त्यावर बरीच मेहनत घेतली आहे. त्यानं आपल्या बॉडी मेकिंगचे, हेअर स्टाइलचे आल्बम रिलीज केलेच,शिवाय दुखापतीचाही आल्बम रिलीज केला. तामीळ सिनेमाचा हा रिमेक आहे. आपल्या पत्नीच्या खुन्याचा शोध घेणारा प्रियकर. अपघातामुळे तो कुठलीही गोष्ट फक्त 15 मिनिटंच लक्षात ठेवू शकतो. आमीरचं नवं लूक सिनेमाचं वैशिष्ट्य. त्याच्याबरोबर असिन ही नवी हिरॉइन आहे. गजनीचा दिग्दर्शक आहे मुरूगदॉस. तामिळ गजनीचा दिग्दर्शकही हाच होता. गजनीला स्पर्धा दिली आहे ती एका हत्तीनं. ' गजनी 'बरोबर रिलीज होतोय ' जम्बो '. या अ‍ॅनिमेटेड सिनेमात ब्लू हत्ती पिंक हत्तिणीच्या प्रेमात पडतो, अशी मजेशीर कथा आहे. या सिनेमात जम्बोचा आवाज आहे अक्षय कुमारचा, त्याच्याबरोबर डिंपल कापडिया, लारा दत्ता, असरानी,गुलशन ग्रोव्हर यांचेही आवाज आहेत..या सिनेमाचं प्रि पब्लिसिटीचं गाणं अक्षय कुमारवर चित्रित केलंय आणि ते मस्तच आहे. एकूणच हा जम्बो गजनीला कसा सामना देतोय ते पाहायचं. यावेळी दोनच सिनेमे रिलीज होत असले, तरी सिनेप्रेमींसाठी हे दोन्ही सिनेमे बघणं मस्टच आहे!

close