संजूबाबा पुन्हा जाणार तुरुंगात

March 21, 2013 9:40 AM0 commentsViews: 31

21 मार्च

नवी दिल्ली : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प् रकरणी बॉलीवूडचा अभिनेता संजय दत् त पुन्हा खलनायक ठरला आहे, संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. संजय दत्तला टाडा कायद्याअंतर्गत दहशतवादी कृत्याच्या शिक्षेतून सूट मिळाली. पण एके 56 बंदूक बाळगल्याबद्दल शस्त्रास्त्र कायद्याखाली सहा वर्षाची शिक्षा देण्यात आली होती. ती आता एक वर्षाने कमी करण्यात आली आहे. त्यानं 16 महिन्यांचा तुरुंगवास आधीच भोगला आहे, आता उरलेली 44 महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी त्याला चार आठवड्यांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याचा गुन्हा इतका गंभीर आहे की त्याला प्रोबेशनवर सोडता येणार नाही असे न्यायालयानं स्पष्ट केलं. शिक्षेच्या काळात संजय दत्तला कोणत्याही चित्रपटाचं शुटिंग करता येणार नाही. यामुळे संजय दत्तला घेऊन काम करणार्‍या अनेक निर्मात्यांना मोठा फटका बसणार आहे. तसंच संजय दत्तला झालेल्या शिक्षेबद्दल बॉलिवूडने दूख व्यक्त केलंय. संजय दत्तने अगोदरच शिक्षा भोगली होती न्यायलयाने त्याच्यावर दया करावी अशी मागणी बॉलिवूडमधून होतं आहे.

या हल्ल्यातला मास्टरमाइंड याकूब अब्दुल रझ्झाक मेमनची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. तर इतर दहा जणांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे सर्व आरोपी गेल्या 20 वर्षांपासून तुरुंगात आहेत. आणि उर्वरित आयुष्यही ते तुरुंगात राहतील असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. टाडानं एकूण 19 आरोपींना जन्मठेप सुनावली होती. त्यापैकी 17 आरोपींची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. अश्रफूर रहमान अझिमुल्ला या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर एका आरोपीला एचआयव्ही झाल्याने मानवी भूमिकेतून त्याची सुटका करण्यात आली.

close