आ.क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना अटक

March 21, 2013 9:55 AM0 commentsViews: 31

21 मार्च

मुंबई : विधिमंडळाच्या प्रांगणात पीएसआयला सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम आज पोलिसांसमोर शरण आले. मुंबई क्राईम ब्रँचसमोर हे दोघंही हजर झाले त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. एसीपीला मारहाण केल्याप्रकरणी क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांच्यासह पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला होता. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम, शिवसेना आमदार राजन साळवी, भाजप आमदार जयकुमार रावळ आणि अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा समावेश आहे.

close