राडेबाज आमदांराना एका दिवसाची पोलीस कोठडी

March 21, 2013 11:59 AM0 commentsViews: 10

21 मार्च

मुंबई : विधीमंडळाच्या प्रांगणात पीएसआय सचिन सुर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना किला कोर्टासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी बहुजनविकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांच्यासह पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला. यानंतर काल रात्रीच त्यांना अटक होणार होती. पण त्यांची अटक टळली. अखेर आज सकाळी क्षितिज ठाकूर आणि राम कदम पोलिसांसमोर शरण आले. दुपारी त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं आणि या दोन आमदारांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या निर्णयामुळे क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना आजची रात्र तुरुंगात घालवावी लागणार आहे.

close