सुधारगृहात मुलींवर बलात्कार प्रकरणी अध्यक्षाला फाशी

March 21, 2013 12:53 PM0 commentsViews: 9

21 मार्च

मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्‍या पनवेलमधील गतिमंद मुलींवरील बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणी आज सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली. कल्याणी सुधारगृहाचा संस्थापक रामचंद्र करंजुलेला फाशी तर इतर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी 2 महिलांसह सहा आरोपींना काल दोषी ठरवण्यात आलं होतं. कल्याणी महिला बालसेवा संस्थेचे संस्थापक रामचंद्र करंजुले, नानाभाऊ करंजुले, कर्मचारी खंडू कसबे, प्रकाश खडके, व्यवस्थापिका सोनाली बडदे, आणि पार्वती मावळे यांचा यात समावेश आहे. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ आणि अत्यंत अमानुष असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. 5 मार्च 2011 ला ही घटना उघडकीस आली होती.

close