संयुक्त राष्ट्रसंघात श्रीलंकेविरोधातला ठराव मंजूर

March 21, 2013 3:11 PM0 commentsViews: 12

21 मार्च

आज अखेर जिनिव्हामध्ये श्रीलंकेतील तामिळींवरील अत्याचारांच्या विरोधात अमेरिकेचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सानवी हक्क परीषदेत मंजूर झाला. अपेक्षेप्रमाणे भारताने ठरावाच्या बाजूने म्हणजे श्रीलंकेच्या विरोधात मतदान केलं. पण, भारताने या ठरावासाठी सुचवलेल्या सुधारणा मतदानासाठी यायच्या अगोदरच अमेरिकेने फेटाळल्या होत्या. दरम्यान, श्रीलंकेतील अत्याचारांची एखाद्या तटस्थ आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भारताने केल्याचं कळतंय. श्रीलंकेने हा ठराव चुकीचा आहे आणि तो मर्यादांचं उल्लंघन करतो असं म्हटलं. पाकिस्तान आणि व्हेनेझुएला ने मात्र या ठरावाच्या विरोधात मतदान केलं.

close