स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचा छापा

March 21, 2013 4:23 PM0 commentsViews: 9

21 मार्च

चेन्नई : द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आज सकाळी करूणानिधी यांचा मोठा मुलगा स्टॅलिन याच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. स्टॅलिनच्या मुलानं विदेशी बनावटीची कार कस्टम ड्युटी न भरता आणल्याबद्दलची केस सध्या सुरू आहे. आज त्याच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक स्टॅलिन च्या घरी गेलं. यावर काँग्रेस सीबीआयचा दुरूपयोग करत असल्याच आरोप द्रमुकनं केला. तर हे सरकार सीबीआयच्या जीवावर टिकलंय ही टीका खरी ठरल्याचं भाजपनं म्हटलं. पण, ही तीव्र प्रतिक्रिया बघताच काँग्रेसची तारांबळ उडाली. खुद्द पंतप्रधानांनी निवेदन काढून असे आदेश सरकारच्या वतीने सीबीआयला दिले गेले नसल्याचं स्पष्ट केलं. सोनिया गांधींनी या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांना धारेवर धरल्याची माहिती समोर आली. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तर थेट कॅमेर्‍यासमोर येत हा प्रकार दुदैर्वी असल्याचं म्हटलं.

close