संपादकांविरोधात हक्कभंग प्रस्ताव चुकीचा -राज ठाकरे

March 22, 2013 1:12 PM0 commentsViews: 54

22 मार्च

पत्रकारांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यात काहीही गैर नाही. रागाच्या भरात संपादक बोललेही असतील पण त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात भेडसावणारे प्रश्न मांडले होते. या अगोदरही संपादक निखिल वागळे, राजीव खांडेकर यांनी अनेक घटनांवर मतं मांडली आहे पण हक्कभंग टाकणे हे चुकीचे आहे अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला निषेध नोंदवला आहे. तसंच सगळ्यांनी समतोल राखला पाहिजे हे सर्व ठिक आहे पण विधानसभेत आमदारांनी एका पोलीस अधिकार्‍याला केलेली मारहाण ही घटना दुर्देवी होती. आमदारांनी कसेही वागावे हे बरे नाही. यावर कोणालाही राग येणे साहजिकच होतं. त्यात पत्रकारांना राग आला काय चुकलंय. त्यामुळे अशा हक्काभंगामुळे कसला हक्क आणि कसला भंग असा टोलाही राज यांनी लगावला.

close