संपादकांवरील हक्कभंग रद्द करण्याची छात्रभारतीची मागणी

March 22, 2013 10:21 AM0 commentsViews: 5

22 मार्च

नाशिक : संपादकांवरील हक्कभंग प्रस्ताव विनाअट मागे घ्यावा अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेनं केली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडे छात्रभारती अध्यक्ष शरद कोकाटे आणि पदाधिकार्‍यांनी ही मागणी केली. छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर हे जनतेच्या भावना मांडत असल्याचं त्यांनी माडलंय. विधिमंडळाने आणलेला हक्कभंगाचा हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

close