मंदीमुळे मारुती सुझुकीही अडचणीत

December 24, 2008 4:08 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर देशातली एक मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीही मंदीमुळे अडचणीत आली आहे. मार्केटमधली मागणी कमी झाली तर उत्पादन कमी करावं लागेल असं कंपनीनं सांगितलंय. नुकत्याच लॉन्च केलेल्या मारुती ए-स्टारची निर्यात कंपनी पुढल्या वर्षात फेब्रुवारी-मार्चपासून सुरू करणार आहे. मात्र 2007च्या तुलनेत कंपनीचं विक्रीचं प्रमाण 3 % कमी झालं आहे. आणि बँकांकडून ऑटो लोन मिळत नसल्यामुळे गाड्यांची मागणी घटल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

close