तारापूरमध्ये ड्रग्ज कंपनीत स्फोट, 4 ठार

March 22, 2013 1:11 PM0 commentsViews: 2

22 मार्च

तारापूर येथे आरती ड्रग्ज या कंपनीत झालेल्या स्फोटने एमआयडीसी हादरली. या स्फोटात चारजणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. तर 2 जण बेपत्ता आहेत. हे दोघे ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पहिला स्फोट झाला. आणि त्यांनंतर एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. हे स्फोट इतके भीषण होते की कंपनीपासून 10 किलोमिटरच्या परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटांमुळे कंपनीचे तीन मजले उद्धवस्त झाले आहे.

close