तीन आमदारांचं निलंबन मागे घेणार?

March 22, 2013 2:19 PM0 commentsViews: 15

22 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यंवंशी मारहाण प्रकरणातल्या तीन आमदारांचं निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. निलंबित झालेल्यांपैकी मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर अटकेत आहेत. त्या दोघांची नावं एफआयआरमध्ये आहेत. पण एफआयआर मध्ये नावं नसलेल्या भाजपचे आमदार जयकुमार रावल, शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल या तीन आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी सेना भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे सेना भाजपच्या या तीन निलंबित आमदाराचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मांडला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यांचं निलंबन मागे घेणार ?

- प्रदीप जयस्वालआमदार, शिवसेना

- राजन साळवीआमदार, शिवसेना

- जयकुमार रावलआमदार, भाजप

close