कांगारूंचे लोटांगण, पहिला दिवस 8 विकेटवर 231 रन्स

March 22, 2013 2:46 PM0 commentsViews: 9

22 मार्च

दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्येही भारतीय बॉलर्सनं दमदार कामगिरी केलीय. टेस्टच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची 8 विकेटवर 231 अशी अवस्था झालीय. ईशांत शर्माने ओपनिंगला आलेल्या डेव्हिड वॉर्नरला शुन्यावर आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियानं विकेट गमावल्या. पण पीटर सिडेल आणि पॅटिनसननं नवव्या विकेटसाठी 50 रन्सची पार्टनरशिप करत आजचा दिवस खेळून काढला. ईशांत शर्मानं 2, तर आर अश्विननं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

close