‘भंडारा हत्या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवणार’

March 22, 2013 2:50 PM0 commentsViews: 18

22 मार्च

मुंबई : भंडारा येथील 3 अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी विधानभवनात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याबाबतचं पत्र दिलं. ती मागणी मान्य करत मृत मुलींच्या आईला 10 लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. गरज पडल्यास तपास सीबीआयकडे देण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिलंय.

close