पोलिसांनी उधळून लावला दहशतवादी हल्ल्याचा कट

March 22, 2013 4:47 PM0 commentsViews: 11

22 मार्च

दिल्ली : होळीच्या तोंडावर दहशतवादी हल्ल्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गोरखपूरमध्ये अटक केलीय. लियाकत शाह असं त्याचं नाव असून तो काश्मीरमधल्या सोपोरचा रहिवासी आहे. होळीच्या दिवशी घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा कट होता अशी माहिती लियाकतनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या अटकेनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं जामा मशीद परिसरातल्या एका गेस्ट हाऊसवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना एके-56 रायफल, हँडग्रेनेड्स आणि दारुगोळ्याचे 60 राऊंड्स सापडले आहेत. लियाकतला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close