सलमान खानवर आरोप निश्चित

March 23, 2013 9:29 AM0 commentsViews: 98

23 मार्च

राजस्थान : काळवीट शिकारीप्रकरणी जोधपूर कोर्टाने आज अभिनेता सलमान खानवर आरोप निश्चित केले. जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाचं शुटिंग सुरू असताना 1 आणि 2 ऑगस्ट 1998 च्या रात्री सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर वन्यजीव रक्षक कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तो दोषी सिद्ध झाल्यास त्याला 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिकारीत त्याला मदत केल्याबद्दल सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बूविरोधात नव्यानं आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पण, सलमान खान उपचारांसाठी अमेरिकेत असल्याने तो न्यायालयात हजर नव्हता. या प्रकरणाची पुढची सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.

close